breaking-newsमनोरंजन

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी केलं कतरिना कैफचं कन्यादान…

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी जया बच्चन, कतरिना कैफ आणि साऊथ स्टार नागार्जुनसोबत एका जाहिरातीचं शुटिंग केलं. यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

जाहिरातीमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन नवरी बनलेल्या कतरिना कैफच्या आई-वडिलांच्या भूमिकेत दिसून आले. सोशल मीडियावर या जाहिरातदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन अभिनेत्री कतरिना कैफसोबत डान्स करताना दिसत आहेत. सर्व फोटोंवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत. तसेच अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे साऊथ कल्चरच्या कपड्यांमध्ये दिसून येत आहेत.


या फोटोमध्ये बॉलिवूड स्टार्ससोबत साऊथ सिनेमाचे स्टार्सही दिसून येत आहेत. या फोटोंमध्ये एका बाजूला नागार्जुन आहे, जो लेजेंड्री अक्किनेनी नागेश्वर राव यांचा मुलगा आहे. त्यानंतर शिवराज कुमार उभा आहे, जो कन्नड सिनेमाचे लेजेंड्री आणि आयकॉनिक डॉक्टर राज कुमार यांचा मुलगा आहे. तसेच याव्यतिरिक्त तमिळ सिनेमाचे लेजेंड्री आणि आयकॉनिक अभिनेता शिवाजी गणेशन यांचा मुलगा प्रभू देवा आहे

कतरिना कैफला लग्नाच्या मंडपापर्यंत अमिताभ बच्चन घेऊन येत आहेत.


दरम्यान, याआधी कतरिना कैफने सेटवर नवरीच्या वेशात मस्ती करताना दिसून आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button