breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

वायसीएम रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता

  • सात विषयांना मिळाली आर्युविज्ञान परिषदेची परवानगी
  • 24 डाॅक्टर एमडी आणि एमएस पदव्युत्तर पदवीसाठी घेणार प्रवेश 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या उर्वरीत सहा अभ्यासक्रमास भारतीय आर्युर्विज्ञान परिषदेने मान्यता दिली. तसेच यंदा या अभ्यासक्रमास 24 डाॅक्टरांना प्रवेश मिळणार आहे. दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका देशातील पहिली आहे. अशी माहिती अधिष्ठाता डॉ. पद्माकर पंडीत यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे उपस्थित होते. 

संत तुकारामनगर येथे महापालिकेने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे 700 बेडचे आहे. हे रुग्णालय गोरगरीब रुग्णासाठी वरदायिनी ठरले आहे. मात्र, रुग्णालयात डाॅक्टरासह अन्य कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने अनेक गैरसोयीचा सामना रुग्णांना करावा लागत होते. त्यामुळे रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याचा प्रस्ताव तत्कालीन आयुक्त डाॅ. श्रीकर परदेशी यांनी केंद्र शासनाकडे प्रस्ताव दिला होता. त्यावेळी हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी हे महाविद्यालय करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

त्यानुसार वायसीएमएच रुग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याची कार्यवाही कार्यान्वित आहे. या महाविद्यालयासाठी विविध 103 पदे मंजूर झाली आहेत. नवीन अभ्यासक्रमासाठी नऊ प्राध्यापक, 15 सहयोगी प्राध्यापक तसेच 21 सहायक प्राध्यापक अशी 45 पदे भरण्यात आली आहेत. त्याचबरोबर औषध वैद्यक, शल्यशास्त्र, क्ष-किरण निदान या तीन विषयाकरिता अर्ज केल्याचेही, डॉ. पंडित यांनी सांगितले.

दरम्यान,  भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेच्या सहा अभ्यासक्रमाला शुक्रवारी मान्यता दिली. यामध्ये कान, नाक, घसा (तीन जागा), भूलशास्त्र (4), मानसोपचार (3), स्त्रीरोग आणि प्रसुती (3), बालरोग (4), विकृतीशास्त्र (3), अस्थिरोग (4) या सात अभ्यासक्रमांना आणि त्यासाठी 24 जागा भरण्यास मान्यता मिळाली आहे. एप्रिल महिन्यात या जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये 12 जागा भारतभरातून तर 12 जागा महाराष्ट्रातून भरल्या जाणार आहेत. गुणवत्ता, शासकीय नियमानुसार या जागा भरण्यात येणार आहेत.

 ”वैद्यकीय महाविद्यालय चालविणारी पिंपरी-चिंचवड देशातील एकमेव महापालिका आहे. महाविद्यालयासाठी गुणवत्तेवर विद्यार्थी मिळणार आहे. महाविद्यालयामुळे वायसीएमएचाला डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. निवासी डॉक्टर असल्याने वायसीएमवरील ताण कमी होईल. त्यामुळे आगामी काळात वायसीएमएचमध्ये आमुलाग्र बदल होईल. ऑपरेशन थेटरच्या नुतणीकरणाचे देखील काम सुरु आहे. भविष्यात देशातील एक आदर्श रुग्णालय म्हणून वायसीएमएच रुग्णालय नावारुपाला येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला”. 

एकनाथ पवार, सभागृह नेता 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button