breaking-newsमनोरंजन

रणबीरमुळे माझ्या आणि आलियातील मैत्रीची समीकरणं बदलणार नाहीत- कतरिना

गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ कतरिना बॉलिवूडमध्ये आहे. या दहा वर्षांत आलिया भट्ट सोडली तर कतरिना कोणत्याही अभिनेत्रीशी घट्ट मैत्री करण्याच्या फंद्यात पडली नाही. मात्र आलियानं तिचाच पूर्वाश्रमीचा प्रियकर रणबीर कपूरसोबत सूत जुळवल्यानं या दोघांच्याही मैत्रीत दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र कतरिनानं या चर्चा खोडून काढल्या आहेत.

‘ती कोणाला डेट करते याचा आणि माझं तिच्याशी असल्याचा नात्याचा काहीच संबध येत नाही. या गोष्टीवरून तिच्या आणि माझ्यातल्या नात्याची समीकरणं बदलणार नाही.’ असं कतरिनानं नुकतंच फेमसली फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

रणबीर आणि कतरिना गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. हे दोघंही लग्न करतील अशाही चर्चा होत्या. मात्र ‘जग्गा जासूस’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांच्या नात्यात दुरावा आला. त्यानंतर कतरिनाची जीवलग मैत्रीण आलिया रणबीरला डेट करू लागली. पहिल्यांदा मे २०१८ मध्ये  आलिया- रणबीर सोनम कपूरच्या लग्नात एकत्र दिसले होते. तेव्हापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. २०२० मध्ये हे दोघंही लग्न करणार असणार आहे असंही म्हटलं जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button