breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम’च्या वाॅर्डात घुसला साप; बेडवरील रुग्णांसह नातेवाईकांनी ठोकली धूम..!

वायसीएमच्या रुग्णांसह नातेवाईकांची सुरक्षा वा-यावर 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आज (शनिवारी) सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास 301 मधील पुरुष वाॅर्डात अचानक साप घुसला, साप वाॅर्डात घुसल्याचे समजताच बेडवरील उपचार घेणा-या रुग्णांसह नातेवाईकांनी घाबरुन बाहेर पळ काढला. मात्र, तेथील सुरक्षा कर्मचा-यांनी तात्काळ सर्प मित्राला बोलावून वाॅर्डातील साप एका तासभरानंतर पकडून तो पालिकेच्या सर्प उद्यानाकडे सुपुर्त केला. त्यानंतर वाॅर्डातील घाबरलेल्या रुग्णांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांची सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रुग्णांसह नातेवाईकांच्या सुरक्षेकडे नेहमीच दुर्लक्ष झाल्याच्या अनेक घटना वारंवार निर्दशनास आले आहे. त्यात आज ( शनिवारी) सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या 301 मधील पुरुष वाॅर्डात साप घुसला. साप वाॅर्डात घुसल्याने सर्वांची पळापळ सुरु होवून गोंधळ उडाला. तसेच घाबरलेल्या रुग्णांसह नातेवाईकांनी वाॅर्डाबाहेर धुम ठोकली. वाॅर्डातील परिचारिका, वाॅर्डनही बाहेर पडले. अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्वांची घाबरगुंडी झाली होती. 

याबाबत वाॅर्डातील प्रमुख परिचारिकांनी तत्काळ सुरक्षा विभागाकडे संपर्क साधला. सुरक्षा विभागाकडून महापालिकेच्या सर्प उद्यानास कळवून सर्प मित्राला बोलाविण्यात आले. त्यानंतर सर्प मित्राने तो साप पकडून सर्प उद्यानात दाखल केला आहे. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. दरम्यान, वायसीएम रुग्णालयातील रुग्णांसह नातेवाईकांची सुरक्षेकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. ही घटना उघडकीस येवू म्हणून सर्वांना तंबी देवून बाहेर वाच्यता करु नका, अशी तंबी संबंधित डाॅक्टरांनी रुग्णालयीन कर्मचा-यांनी दिली होती.   

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button