breaking-newsमहाराष्ट्रराष्ट्रिय

‘यामाहा’च्या या प्रसिद्ध बाईकची विक्री बंद, काय आहे कारण?

यामाहा मोटार इंडिया कंपनीने भारतात YZF-R15 V2.0 या मॉडेलच्या बाईकची विक्री बंद केली आहे. कंपनीने R15 V2.0 या बाईकला अधिकृत संकेतस्थळावरुनही हटवलं आहे. कंपनीने याचवर्षी जवळपास 6 महिन्यांपूर्वी YZF-R15 V3.0 या नव्या व्हर्जनची विक्री सुरू केली होती. भारतीय बाजारात R15 V3.0 च्या मागणीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे कंपनीने सेकंड जनरेशन R15 ची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

YZF-R15 V3.0 लॉन्च करतेवेळी सेकंड जनरेशन R15 ची विक्री बंद करण्यात येईल असी कोणतीही घोषणा कंपनीने केली नव्हती, पण गेल्या काही महिन्यांमध्ये V3.0 च्या मागणीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे कंपनीने V2.0 या मॉडेलच्या बाईकची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. Yamaha YZF-R15 ला भारतात जवळपास १० वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आलं होतं. लॉन्चिंगपासूच ही बाईक ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली होती. 150 सीसी सेगमेंटमध्ये ही बाईक अनेकांची पहिली पसंती ठरत होती.

मात्र, R15 S(पहिलं व्हर्जन) आणि R15 V3.0 ची विक्री बंद होणार नसल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. म्हणजे R15 चं पहिलं व्हर्जन आणि तिसरं व्हर्जन बंद होणार नाहीये. Yamaha R15 V2.0 ची किंमत 1.18 लाख रुपये होती, म्हणजे व्हर्जन 3.0 पेक्षा ही बाईक जवळपास 9 हजार रुपयांनी स्वस्त होती. तर R15 S ची किंमत 1.15 लाख रुपये आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button