breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मुंबई – पुणे महामार्गावर अपघातात २ ठार, २० जखमी

पुणे – मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूरजवळ खासगी बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात आज सकाळी १० च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात २ जण ठार झाले, तर २० जण जखमी झाले आहेत.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, एका खासगी बसमधून प्रवासी सहलीसाठी वसईहून महाबळेश्वरला जात होते. यावेळी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूरजवळ बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. जखमींना  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button