breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

महिला डब्यात विष्ठा टाकणाऱ्या विकृताला अटक

मुंबई –  सीएसटीएम स्थानकातून सकाळी सुटणाऱ्या लोकलमधील महिला डब्यांमध्ये हस्तमैथून करणाऱ्या तसंच सीटवर विष्ठा पसरवून ठेवणाऱ्या विकृताला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. महिला डब्यांमध्ये कोणी नसल्याची संधी साधत आरोपी हा किळसवाणा प्रकार करायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गेल्या एका महिन्यात १० लोकल ट्रेनना टार्गेट केलं होतं. यामुळे अनेकदा मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर परिणाम होत होता. आरोपीचं नाव दिनेश दुर्वे असून तो कर्जतचा रहिवासी आहे. हे कृत्य केल्यानं आपल्याला आनंद मिळायचा असं त्याने पोलिसांना सांगितलं आहे.

रेल्वे पोलिसांनी तपास सुरु केला होता, मात्र त्यांच्या हाती काहीच सुगावा लागत नव्हता. पण ९ सप्टेंबरला मध्य रेल्वेच्या नव्या डब्यात दिनेश दुर्वेने प्रवेश केला आणि तिथेच तो जाळ्यात अडकला. ‘बदलापूरला जाणाऱ्या त्या लोकल ट्रेनच्या महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरा लागला होता. फुटेजमध्ये आरोपी दिनेश हातात एक प्लास्टिक पिशवी घेऊन सकाळी ६.५६ वाजता महिला डब्यात प्रवेश करताना दिसत आहे. प्रवेश कऱण्याआधी आतमध्ये कोणी नाहीये ना याची खातरजमा तो करतो. आतमध्ये गेल्यावर हस्तमैथून करण्यास सुरुवात करतो. नंतर सीटजवळ जाऊन त्यावर विष्ठा पसरवतो आणि निघून जातो’, अशी माहिती सीएसएमटी लोकल आरपीएफ इन चार्ज डी व्ही सिंग यांनी दिली आहे.

महिला प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना डबा स्वच्छ करायला सांगितल्याने बदलापूर ट्रेन १५ मिनिटं उशिरा सुरु झाली होती अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार समोर आला होता. मुंबई सेंट्रल विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भोसले यांनी चौकशी दिल्याचा आदेश दिल्यानंतर याची नोंद झाली’, असं सिंग यांनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button