breaking-newsराष्ट्रिय

भाजपशी साटेलोटे केल्याबद्दल द्रमुकची अद्रमुकवर टीका

चेन्नाई – भाजपच्या अनेक गैरकारभारानंतरही तामिळनाडुतील अद्रमुकने लोकसभेत भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल द्रमुकने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांची ही कृती अभद्रपणाची आहे. नीट परिक्षेबाबतचे धोरण, पंधराव्या वित्त आयोगामार्फत झालेला अन्याय, जीएसटीतून झालेले नुकसान, हिंदी लादण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न, अशा साऱ्या पार्श्‍वभूमीवर अद्रमुकने भाजपला पाठिंबा देणे हे पुर्णपणे अनाठायी आहे असे द्रमुकचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

अद्रमुकचे लोकसभेत 37 खासदार असून हा पक्ष लोकसभेतील कॉंग्रेस नंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. या पक्षाने काल भाजपला लोकसभेत पाठिंबा दिला. लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात आलेल्या अविश्‍वास ठरावाच्या बाजूने अद्रमुकने मतदान करायला हवे होते असेही स्टॅलिन यांनी म्हटले आहे. कालच्या अविश्‍वास प्रस्तावावर सरकारच्या बाजूने 325 मते पडली तर विरोधात 126 मते पडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button