breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुलाला अडसर ठरणारे “फिडर वायर” स्थलांतरासाठी पालिकेला 39 लाखांचा “भुर्दंड”

  • यापूर्वी “सब स्टेशन” स्थलांतरासाठी रेल्वे प्रशासनाला साडेपाच कोटी अदा
  • “फिडर वायर”च्या अडथळ्यामुळे खर्चात झाली वाढ

पिंपरी – निगडी भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाला अडसर ठरणारा सब स्टेशन स्थलांतरित करण्यासाठी आतापर्यंत मध्य रेल्वे प्रशासनाला महापालिकेतर्फे 5 कोटी 54 लाख 25 हजार 159 रुपये अदा केले आहेत. मात्र, आता फिडर वायरमुळे या खर्चात वाढ झाली असून पालिकेला सुमारे 39 लाखांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. पालिकेने 39 लाख रुपये रेल्वे प्रशासनाला अदा केले असून याबाबतच्या प्रस्तावाला आज मंगळवारी (दि. 19) झालेल्या स्थायी समिती सभेत मंजूरी देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध मार्गांवर बीआरटीएस मार्ग विकसित करण्यात येत आहेत. या अंतर्गत मुकाई चौक ते भक्ती-शक्ती चौकापर्यंत महापालिकेच्या विकास आराखड्यात 45 मीटर रुंदीचा बीआरटीएस रस्ता विकसित करण्यात येत आहे. या रस्त्याचे रावेत येथील निसर्ग दर्शन येथील लोहमार्गामुळे दोन भाग होतात. त्यामुळे याठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याकरिता 2015 मध्ये निविदा काढण्यात आली आहे. याकरिता 87 कोटी 46 लाख 50 हजार 266 रुपये खर्च येत आहे. हा ठेका मेसर्स बी. जी. शिर्के प्रा. लि. कंपनीला देण्यात आला आहे. या रस्त्यावर मध्य रेल्वे लोहमार्गावरील उड्डाणपुलाचे संकल्पचित्र रेल्वे प्रशासनाच्या मान्यतेकरिता पाठविण्यात आले आहे.

या संकल्प चित्रानुसार रेल्वेनजीक असलेले सबस्टेशन हलविण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार रेल्वे अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी करुन हे सबस्टेशन स्थलांतरित करण्याचे अंदाजपत्रक करण्यात आले आहे. त्यानुसार 24 जुलै 2015 च्या पत्रानुसार पाच कोटी, 77 लाख 63 हजार 43 रुपये शुल्क जमा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने 31 डिसेंबर 2016 रोजी रेल्वे प्रशासनाला पाच कोटी 54 लाख 25 हजार 159 रुपयांचा धनादेश अदा करण्यात आला आहे.

दरम्यान, हे सब स्टेशन स्थलांतरित करताना, तीन किलोमीटरची फिडर वायर स्थलांतरीत न केली गेल्याने या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता आणि केंद्रीय रेल्वे विद्युत विभाग यांनी नऊ लाख 94 हजार 641 रुपये आणि 28 लाख 91 हजार 700 रुपये असे एकूण मिळुन 38 लाख 86 हजार 341 रुपये वाढीव खर्च देण्याची मागणी मध्य रेल्वे प्रशासनाने पालिकेकडे केली होती. या प्रस्तावाला स्थायी समितीने आज मान्यता दिली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button