breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवड महापालिकेत #MeToo’ चा दणका ; आरोग्य सेवकावर निलंबनाची कारवाई ?

तालेरा हाॅस्पीटलमधील एका महिलेची तक्रार

महिला तक्रार निवारण समितीच्या चाैकशीत आरोग्य सेवक दोषी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – चिंचवड येथील तालेरा हाॅस्पीटलमध्ये कार्यरत असणा-या आरोग्य सेवकाविरोधात तेथील एका महिलेने लैंगिक छळाची तक्रार विभागातील महिला तक्रार निवारण समितीकडे केल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली. या तक्रारीची गंभीर दखल घेवून त्याची त्रिसदस्यीय समितीकडून चाैकशी करण्यात आली. संबंधित आरोग्य सेवक चाैकशीअंती दोषी आढळला आहे. समितीने तो अहवाल आयुक्ताकडे सादर केल्यानंतर संबंधितावर आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. 

श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेतही `#MeToo’ ची अनेक प्रकरणे दडपली जात आहेत. महापालिकेतील महिला, मुली नोकरी व इभ्रतींच्या भीतीने पोलिसांकडे तक्रार करण्यास  कुणी पुढे येत नाहीत. त्यामुळे #MeToo’ची शिकार झालेल्या कित्येक तक्रारदार महिलेने स्वतःहून बदली करुन घेतल्याचा अनेक घटना घडत आहेत. महापालिकेत मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीसह प्रत्येक विभागात त्या समित्या स्थापन केलेल्या आहेत. तरीही #MeToo’च्या बळी ठरलेल्या महिलांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे. मात्र, काही प्रकरणे देशभरात समोर आल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेतही काही प्रकरणे उजेडात येवू लागली आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अनेक विभागात #MeToo’ ची चर्चा होवू लागली आहे.  अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कनिष्ठ महिला या #MeToo’च्या शिकार होत आहेत. यापुर्वी एका विभागप्रमुखाच्या लिपिकानेही असे धाडस केलेले आहे. त्याच्या विरुध्द महिला छळाची तक्रार झालेली होती. काही विभाग प्रमुखांवर कडक कारवाई होण्याऐवजी तक्रारदार महिला कर्मचाऱ्यांच्या बदलीचे प्रकार घडले आहेत. तसेच किरकोळ कारवाई करुन महापालिकेतील तक्रारी अद्याप पोलिसांकडे न जाता तेथेच दडपली जात आहेत.

दरम्यान,  चिंचवडच्या तालेरा हाॅस्पीटलमधील एका कार्यरत असणा-या महिलेने त्या आरोग्य सेवकावर लैगिंक छळाचा आरोप करीत त्याची तक्रार महिला तक्रार निवारण समितीकडे काही दिवसापुर्वी केली. संबंधित तक्रारीची दखल घेवून त्यावर त्रिससदस्यीय समितीने चाैकशी अहवाल तयार केला. त्या चाैकशीत संबंधित आरोग्य सेवकानी सुुरुवातील गुन्हा कबूल केला. तसेच यापुढे असे करणार नसल्याचे सांगितले. मात्र, समितीने तो अहवाल विभाग प्रमुखासह आयुक्तांकडे पाठवून दिला. त्यावर संबंधित आरोग्य सेवकांवर सेवा निलंबनाची कारवाई करण्यात आली. याबाबत महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button