breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवार कुटुंबाविषयी भाजप, ‘आरएसएस’ने अफवांची बिजे पेरली – पार्थ पवार

  • तळेगाव स्टेशन येथे कार्यकर्त्यांची घेतली आढावा बैठक
  • आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीला आला वेग

पिंपरी, (महाईन्यूज) – पुलवामा प्रकरण आणि पवार कुटुंबियांविषयी अफवांची बीजे भाजपा आणि आरएसएसने पेरली. प्रशांत किशोरच्या टीमने मावळात जाणूनबुजून अशी रणनिती राबविली. त्यामुळे त्यांच्या उमेदवाराला काहीच करावे लागले नाही. आता लोकसभेच्या पराभावर चर्चा न करता बदल करण्यासाठी संवादाची गरज आहे. आता विधानसभेसाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी कार्यकर्त्यांना तळेगाव स्टेशन येथे केले.

  • येथील रिक्रिएशन हॉलमध्ये पवार यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी शहराध्यक्ष गणेश काकडे, तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे, नगरसेवक संतोष भेगडे, कैलास गायकवाड, तळेगाव शहर युवकचे अध्यक्ष आशिष खांडगे, महिला शहराध्यक्षा सुनिता काळोखे आदी यावेळी उपस्थित होते.

पार्थ पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आपला पराभाव झाला, तो ईव्हीएम मशिनमधील तांत्रीक अफरातफर घडविल्यामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु, आपल्याजवळ ईव्हीएमबाबत तसे पुरावे नाहीत. त्यावर चर्चा करणे ही व्यर्थ आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता बुथनिहाय नियोजन करावे. मतदारांशी संपर्क वाढावावा. नेत्यांनी पक्षसंघटन वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

  • बबनराव भेगडे म्हणाले की, मावळातला कोणी मंत्री म्हणून विजयी होईल हा समज मनातून काढून टाका. पराभवाने खचून गेलेल्या कार्यकर्त्यांना धिर देऊन त्यांना कार्यरत करण्यासाठी पार्थ पवार यांनी तालुक्याचा दौरा हाती घेतला आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर आहे. लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाची पावती घ्यायची असेल तर सर्वजातीधर्माच्या कार्यकर्त्यांचे आणि महिलांचे संघटन तसेच मतदारांशी संपर्क वाढविण्यावर भर दिला पाहिजे.

गणेश काकडे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष देईल त्या उमेदवाराचे निष्ठावंत म्हणून काम करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. पक्षाच्या उमेदवाराचा विजय खेचून आणण्याचा निश्चित त्यांनी केला. पार्थ पवार यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना पदाधिकारी यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र दाभाडे, महेश फलके, शंकर भेगडे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कोतुळकर, माजी नगरसेवक आयुब सिकिलकर आदी यावेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button