breaking-newsराष्ट्रिय

निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी बदललं नाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील नावात बदल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे नवीन नाव तर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी देखील ‘चौकीदार अमित शाह’ असे नाव ठेवले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याशिवाय भाजपाच्या सर्वच नेत्यांनी ट्विटरवर आपल्या नावाआधी चौकीदार लावले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपामधील चौकीदारचा वाद प्रचारादरम्यान चांगलाच गाजण्याची शक्याता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चौकीदार चोर है’, या राहुल गांधी यांच्या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनं ‘मै भी चौकीदार’ म्हणत एक व्हिडीओ नुकताच तयार केला होता. आता मोदी आणि अमित शाह यांनी आपल्या नावात बदल केला आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. राहुल गांधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागत आहेत. चौकीदार चौर है या राहुल गांधी यांच्या टिकेला भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

शनिवारी पंतप्रधान मोदींनी #MainBhiChowkidar या हॅशटॅगसह एक व्हिडिओ टि्वट करत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार मोहिम सुरु केली आहे. या व्हिडिओमध्ये एक गाणे असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जनसभामध्ये लोकांसोबत, रणगाडयामध्ये दिसतात. या गाण्यामध्ये प्रामुख्याने लोक सुद्धा ‘में भी चौकीदार हूँ’ बोलताना दिसतात. जे कोणी देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मेहनत घेत आहेत ते सुद्धा चौकीदार आहेत. आज प्रत्येक भारतीय #MainBhiChowkidar म्हणत आहे असे मोदींनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओला मोठ्या प्रमाणावर रिट्विट आणि लाईक्स मिळाले आहेत. पण, त्याला देखील राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं असून त्यांनी ‘मै भी चौकीदार’ म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, नीरव मोदी, विजय माल्ल्याचा फोटो ट्विट केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button