breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नादुरुस्त फूटपाथ, चेंबर तातडीने दुरुस्ती करा – महापाैर राहूल जाधव

पाहणी दाै-यात संबंधित अधिका-यांना सुचना

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरातील नादुरूस्त फुटपाथ व चेंबर तातडीने दुरूस्त करण्याच्या सुचना महापौर राहुल जाधव यांनी संबंधित वरिष्ठ अधिका-यांना आदेश दिले. 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या मिळकती, उद्याने, क्रीडांगणे, समाज मंदीर, सांस्कृतिक हॉल, स्पर्धा परिक्षा केंद्र यांना भेटी देवून पाहणी करण्यात आली. यावेळी महापौरांनी सुचना दिल्या. यावेळी ग प्रभाग अध्यक्ष बाळासाहेब त्रिभुवन, नगरसदस्य अर्चना बारणे, झामाबाई बारणे, सविता खुळे, चंद्रकांत नखाते, उषाताई वाघेरे, संदिप वाघेरे निखिता कदम, स्विकृत सदस्य गोपाळ माळेकर, विनोद तापकीर, संदीप गाडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष शरद गावडे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी बारणे, क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे उपस्थित होते.

महापाैर जाधव यांनी थेरगाव येथील बोट क्लब, बापुजीबुवा उद्यान व ओपन जीम, वेंगसरकर क्रिकेट अकादमी, शिवाजी महाराज उद्यान डांगे चौक, केजूदेवी उद्यान, संभाजी उद्यान रहाटणी, पिंपरी येथील नवमहाराष्ट्र शाळेतील गाळे, जोग महाराज उद्यान पिंपरी, दशरथ कापसे व्यायामशाळा पिंपरी, साधु वासवाणी उद्यान, पिंपरी, हेमु कलाणी उद्यान पिंपरी, आदी ठिकाणी भेटी दिल्या. उद्यानामध्ये ओपन जीम बसविणे व कारंजे दुरूस्त करुन सुरू करणे, क्रीडांगणावर लाईटची व्यवस्था करणे, स्वच्छता मोहिमे अंतर्गत वॉर्डात स्वच्छता राखणे, दररोज साफसफाई करणे, राडारोडा उचलणे, स्ट्रॉम वॉटर लाईन मधील चेंबर दुरूस्त करणे, काळेवाडी बीआरटी रोड स्वच्छ करणे, कचरा उचलणे, केजूदेवी मंदिरा समोरील नदीकडेच्या बाजूस कचरा उचलणे, नदीजवळील नावाचे/ सुचना फलक बोर्ड दुरूस्त करणे. क्रीडांगणे विकसित करणे, बोट क्लब येथील व्यायामशाळेला आवश्यक साहित्य पुरविणे, उद्यानातील भंगार साहित्य उचलणे, नवमहाराष्ट्र शाळे समोरील गाळ्यांचे भाडे कमी करणे व रिक्त गाळे भाड्याने देणे,अशा सुचना महापौर राहुल जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच उद्या (गुरुवारी) दि. १७ रोजी ह क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या मिळकतींची पाहणी करणार असल्याचेही सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button