breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दोघा रुमानियन परदेशी हॅकर्सना कोल्हापुरात अटक

कोल्हापूर – एटीएम मशीनला स्कीमर बसवून जगभरातील विविध बँकांतील ग्राहकांच्या खात्यांवरील आॅनलाईन सिस्टीम हॅक करून त्यावरून कोट्यवधी रुपये लुटणाऱ्या दोघा रुमानियन परदेशी हॅकर्सना शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री शिताफीने अटक केली. संशयित आरोपी पीरजोल एमनॉईल (वय ४०), सिपोस वासिले लॉर्डियन (३७) अशी त्यांची नावे आहेत.

या दोघांनी गोवा राज्यातील पेडणे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका दिवसात चार एटीएम मशीनवरून आॅनलाईनद्वारे रोकड लुटल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. तेथून हे दोघे पोलिसांना चकवा देऊन कोल्हापूरला पळून आले होते. ते येथील एका पंचतारांकित हॉटेलवर उतरल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांनी आतापर्यंत सात ठिकाणांहून एटीएमद्वारे ग्राहकांचे पैसे परस्पर काढून घेतल्याची कबुली दिली आहे.

या दोघांच्या ताब्यातून कार, रोख ७ लाख १८ हजार ५४० रुपये, दोन लॅपटॉप, पाच मोबाईल, सात एटीएम कार्डे, अमेरिका, इंग्लंड, मोरोक्को, रुमानिया, आदी देशांच्या चलनी नोटा, नाणी व पासपोर्ट असा सुमारे २० लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना पुढील तपासासाठी शनिवारी सकाळी गोवा पोलिसांच्या ताब्यात दिले. परदेशी हॅकर्सचे मोठे रॅकेट असून या दोघांच्या चौकशीमध्ये त्याचा पदार्फाश होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button