breaking-newsपुणेमहाराष्ट्र

आम्हांला आरोग्यप्रमुख देता का?

पालिकेचे पुन्हा राज्यशासनाला साकडे

पुणे – सन 2011 पासून रिक्त असलेले मुख्य आरोग्य अधिकारी पद भरण्यासाठी महापालिकेने पुन्हा एकदा राज्यशासनाला साकडे घातले आहे. मागील वर्षी प्रभारी आरोग्य प्रमुख सेवा निवृत्त झाल्यानंतर महापालिकेने या पदासाठी दोनवेळा सरळ भरती प्रक्रिया राबविली. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे ही भरतीच रद्द करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा शासनानेच या पदासाठी प्रतिनियुक्तीने अधिकारी द्यावा, असे पत्र महापालिने पुन्हा एकदा राज्यशासनास पाठविले आहे.

सन 2011 मध्ये महापालिकेचे तत्कालिन आरोग्यप्रमुख डॉ. आर. आर. परदेशी निवृत्त झाल्यानंतर त्यांचा पदभार तत्कालिन उप आरोग्यप्रमुख डॉ. एस.टी. परदेशी यांच्याकडे दिला होता. मात्र, तेदेखील मे-2017 मध्ये निवृत्त झाले. त्यामुळे हे पद रिक्तच होते. तर, या पदावर उप आरोग्यप्रमुख पदावरील अधिकाऱ्यास बढती देता येते. मात्र, त्यासाठी आवश्‍यक शैक्षणिक पात्रता आणि उप आरोग्य प्रमुख 3 वर्षे अनुभव असलेली व्यक्ती पालिकेकडे नाही. त्यामुळे हे पद अजूनही रिक्तच आहे. या विभागाचा प्रभारी पदभार सांभाळणारे डॉ. परदेशींच्या निवृत्तीनंतर हे पद भरण्यासाठी हे पद प्रतियुक्तीने भरावे, असे पत्र महापालिकेने राज्य शासनास पाठविले होते. मात्र, आरोग्य विभागाकडील कोणीच अधिकारी महापालिकेत प्रतिनियुक्तीने येण्यास तयार नाही. त्यामुळे महापालिकेनेच हे पद जाहिरात देऊन भरावे, असे शासनाने कळविले होते.

पालिकेला उमेदवारच मिळेना
राज्य शासनाच्या आदेशानंतर सामान्य प्रशासन विभागाने 19 ऑगस्ट आणि 30 डिसेंबर 2017 अशी दोन वेळा भरती प्रक्रिया राबविली. मात्र, या दोन्ही वेळीस फक्‍त दोनच उमेदवार पात्र ठरले. तसेच दोन्ही वेळेत तेच उमेदवार आले. त्यामुळे ही भरती रद्द करण्यात आली. त्यामुळे या पदासाठी सध्या पालिकेत अधिकारीच नाही, तर उप आरोग्य अधिकारी पदही रिक्तच असल्याने आरोग्य प्रमुखाचा कारभार पाच सहायक आरोग्य प्रमुखांकडे विभागून देण्यात आला आहे. मात्र, आयुक्तांपाठोपाठचे हे मुख्यपद असल्याने ते रिक्त ठेवणे योग्य नाही. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने जुलै 2018 मध्ये पुन्हा राज्यशासनास पत्र पाठविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button