breaking-newsआंतरराष्टीय

दहशतवाद्यांना आश्रय; अमेरिकेने पाकिस्तानला खडसावले

वॉशिंग्टन – पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करावी. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांविरोधात अमेरिका कठोर पावले उचलणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सभेमध्ये अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्व देशांना मदत करण्यासाठी अमेरिका हा नेहमीच पुढाकार घेत आला आहे. सर्व देशांमध्ये परस्पर सहकार्य वाढावे, व्यापार वाढवा, मदत वाढावी म्हणून अमेरिकेने नेहमी पुढाकार घेतला तसेच सहाय्य केले. परंतु दहशतवादाच्या मुद्दावर मात्र कोणत्याही देशाला कधीही सहाय्य केले जाणार नाही’ असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. तसेच पाकिस्तानचे थेट नाव घेत पाकिस्तानने दहशतवादी गटांवर कारवाई करावी, असे देखील अमेरिकेने म्हटले आहे.

दहशतवादाच्या मुद्द्यावरून ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्यावरून वारंवारपणे खडसावले आहे, तसेच अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत देखील अमेरिकेने कमी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button