breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

#Covid-19: पिंपरी चिंचवड शहरात पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान

पिंपरी |

पिंपरी चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण रूग्णालयातील अधिष्ठाता डॉ.वाबळे, अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड विकास ढाकणे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांना पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने नगरसेवक राजू बनसोडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. संपूर्ण जगात कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले असताना पिंपरी-चिंचवड सारख्या शहरात सामाजिक बांधिलकी जपत गोर गरीब जनतेच्या सेवे करीता चोवीस तास सेवा पुरविणारे त्याचबरोबर रूग्णांना देवदूतसमान असणारे आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा करणारे या कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण रूग्णालयातील रुग्णवाहिका चालक, शववाहिका चालक, सुरक्षा रक्षक, अंत्यविधी करणाऱ्या संस्थेतील कर्मचारी यांना कोरोना योद्धा पुरस्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या मध्ये रूग्णवाहिका चालकविठ्ठल पोटले,राहुल कांबळे, निकम, रणजीत हिरवे, सचिन सुतार रूग्णवाहिका, सुरेश खत्री, राजू सजनीयाल सुरक्षा रक्षक पै. अभिषेक फुगे, पैअमरदीप चांदगुडे, भले मेजर, कपिल डोळस, शंकर गायकवाड,भरत भाले, संदीप इदे,अत्यविधी करणारे कर्मचारी सागर पवार, अतुल थोरात, मोहित बसोड, गणेश जगताप, विशाल धावरे, अमित गोडआले, अनंत जानराव यांचा कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आर.पी.आय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष निलेश आल्हाट युवासेना विभागसंघटक निलेश हाके, प्रमोद गायकवाड, विपुल साठे,सुशांत वंजारी, आशिष जगताप,सुनिल गायकवाड उपस्थित होते सर्व सुरक्षारक्षक, रुग्णवाहिका चालक कधी करणारीवर्ग या अनोख्या उपक्रमाबद्दल भारावून गेले व सर्वानी आभार व्यक्त केले.

वाचा- मातृदिनाची चिखलीकरांना दिवंगत दत्ताकाकांची अनोखी भेट!…अन् चिखलीत अवतरलं दत्ताकाकांचं पत्र!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button