breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘तु मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर’ अन्यथा ‘तुझ्या भावी नव-याला ठार मारेण’

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – नुकताच विवाह ठरलेल्या मुलीचा हात पकडून ‘तु मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर’ असे म्हणून एका तरुणाने तिचा विनयभंग केला. ‘माझ्याशी लग्न नाही केल्यास तुझ्या भावी नव-याला खल्लास करणार’, अशी धमकी देणा-या तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार गुरूवारी (दि. 13) रात्री पावनेदहाच्या सुमारास मोरे वस्ती, चिखली येथील यशवंत कॉलनीमध्ये घडला.

दादा मोहन पिसाळ (वय 26, रा. भिमशक्ती नगर, मोरे वस्ती, चिखली) याला अटक केली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिसाळ पाणी पिण्यासाठी बुधवारी रात्री पावनेदहाच्या सुमारास तरुणीच्या घरी गेला. पाणी पिल्यानंतर तरुणीचा हात पकडून ‘तु मला खूप आवडतेस, माझ्याशी लग्न कर’ असे म्हणून तिच्याशी अश्लिल चाळे केले. वरून हा प्रकार कोणाला सांगितला तर ‘तुझ्या भावी नव-याला जीवे मारण्याची धमकी’ देखील दिला. घाबरलेल्या अवस्थेत चिखली पोलीस ठाणे गाठून तरुणीने घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना सांगितले. त्यावर पोलिसांनी तातडीने तक्रार दाखल करून पिसाळला ताब्यात घेतले. संबंधीत वीस वर्षाच्या तरुणीचा विवाह जमलेला आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक जगदाळे यांनी दिली. ते पुढील तपास करीत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button