breaking-newsआंतरराष्टीय

चिनने रचला इतिहास; चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणाऱ्या भागावर उतरवले यान

चिनने अंतराळात आणखी एक मैलाचा दगड रोवला आहे. कारण, चिनने चंद्राच्या बाहेरच्या भागावर जो पृथ्वीवरुन दिसत नाही त्यावर इतिहासात पहिल्यांदाच अंतराळ यान उतरवले आहे. याचे नाव चांगे-४ असे असून गुरुवारी सकाळी १० वाजून ४६ मिनिटांनी या यानाने चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला. अमेरिकेच्या माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. यापूर्वी चिनने चंद्रावर एक रोवर यानही उतरवले होते.

ANI

@ANI

China has landed a spacecraft on the far side of the Moon, reports US media

६३ लोक याविषयी बोलत आहेत

यापूर्वी अमेरिका आणि सोवियत रशिअन संघाने चंद्रावर यान उतरवले होते. मात्र, चांगे-४ हे यान चंद्राच्या खालच्या भागावर उतरवण्यात आले आहे. जो भाग पृथ्वीपासून कायमच दूर अंतरावर असतो. चिनच्या अंतराळ कार्यक्रमावर सूक्ष्मपणे काम करणाऱ्या मकाऊ युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीचे प्रोफेसर झू मेंघूआ यांनी सांगितले की, चिनचे हे अंतराळ अभियान हे दाखवते की, चीन अंतराळ संशोधनात खोलवर संशोधन करण्यामध्ये विश्वात वरच्या पातळीवर पोहोचला आहे. आम्ही चिनी लोकांनी असं काही करुन दाखवलं आहे ज्याची हिम्मत अमेरिकन लोकांनीही केलेली नाही.

तज्ज्ञांच्या मते, चीन वेगाने आपला विकास करीत आहे. तो आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि इतर क्षेत्रात अमेरिकेलाही आव्हान देऊ शकतो. चीन २०२२पर्यंत आपले तिसरे अंतराळ स्टेशन पूर्णपणे कार्यान्वित करण्याची योजना आखत आहे. दरम्यान, चिनने चंद्राच्या अशा पृष्ठभागावर यान उतरवले आहे जेथे अद्याप कोणीही पोहोचू शकलेले नाही. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते अंतराळ यानाचे हे लँडिंग एका प्रचाराशिवाय काहीही नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button