breaking-newsराष्ट्रिय

शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिला भाविक नव्हे माओवादी : भाजपा

केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन भाजपा नेते व्ही. मुरलीधरन यांनी गंभीर आरोप केले आहेत. हा प्रकार म्हणजे पूर्वनियोजित कारस्थान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच मंदिरात प्रवेश केलेल्या महिला या भाविक महिला नसून त्या माओवादी महिला होत्या, असा आरोप त्यांनी केला आहे.

ANI

@ANI

V Muraleedharan,BJP: Y’day,2 women entered . They weren’t devotees. They were Maoists. CPM with selected policemen prepared an action plan&then saw to it that the women go inside the temple. This is a planned conspiracy by Maoists in league with Kerala govt & CPM

८० लोक याविषयी बोलत आहेत

मुरलीधरन म्हणाले, बुधवारी दोन महिला सबरीमला मंदिरात गेल्या. मात्र, त्या भाविक महिला नव्हत्या तर माओवादी महिला होत्या. सीपीएमच्या सत्ताधारी पिनरायी सरकारने काही निवडक पोलिसांच्या मदतीने या महिलांना गाभाऱ्यापर्यंत जाऊ दिले. हा एक सुनियोजित कट होता. हे एक षडयंत्र असून माओवाद्यांनी केरळ सरकार आणि सीपीएमच्या संरक्षाखाली ते तयार केले आहे.

डाव्यांच्या पूर्वग्रहांऐवजी केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या पूर्वग्रहाने लोकांमध्ये भ्रम निर्माण केला आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्देश दिले होते की, महिलांच्या प्रवेशाबाबत आम्ही सहमत आहोत. मात्र, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी जनतेच्या भावनांना ठेस लागू न देता हे सांभाळले पाहिजे. मात्र, केरळ सरकार कोर्टाच्या या अपेक्षेवर पूर्णपणे अपयशी ठरली आहे. अशा प्रकारे हिंदूंवर दिवसाढवळ्या बलात्कार केल्यासारखे आहे, अशा शब्दांत या मुद्द्यावरुन मोदी सरकारचे मंत्री अनंत हेगडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, केरळमधील दोन महिलांनी बुधवारी शबरीमला मंदिरात प्रवेश केला तसेच भगवान आयप्पांचे दर्शन घेतले आणि प्रार्थनाही केली. या दोन्ही महिला त्या वयोगटातील आहेत ज्या वयोगटांतील महिलांवर आजवर मंदिरात प्रवेश बंदी होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने कुठल्याही वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश रोखता कामा नये असे आदेश दिले आहेत. त्यानंतरही रा. स्व. संघाशी संबंधीत काही हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपा कोर्टाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत हिंसक आंदोलने करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button