breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
चिखलीत अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष
पिंपरी – महापालिकेच्या हद्दीत शेकडो बांधकामे अनधिकृतपणे सुरु असताना त्याकडे बांधकाम नियंत्रण व अनधिकृत पथकाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे चिखलीसह अन्य परिसरात अनधिकृत बांधकामे प्रचंड वाढली आहेत.
चिखलीतील नेवाळे वस्तीत अनेक हौसिंग सोसायटीमध्ये (लेन नं. २) विनापरवाना ३ मजली इमारतीचे बांधकाम चालू आहे. त्या इमारतीच्या बांधकामुळे सर्व राडारोडा आजूबाजूच्या टाकण्यात आला आहे. त्या बांधकामाने तेथील लोकांना त्याचा त्रास होवू लागला आहे. व्यावसायिक दृष्टीकोनातून भाडे मिळेल या उद्देशाने तिथे अशाप्रकारची घरे बांधली जात आहेत. या विनापरवाना बांधकामांमुळे महापालिकेचा महसूल बुडत आहे. त्या अनधिकृत बांधकामांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी चिखली परिसरातील नागरिकांतून होवू लागली आहे.