breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

किरकोळ कारणावरून महिलेचा विनयभंग, तरुणावर गुन्हा दाखल

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – क्रिकेट खेळण्यासाठी वापरण्यात येणारा बॉल लागल्याने तो घरी घेऊन गेल्याचा राग मनात ठेवून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपरीतील संत तुकारामनगर येथे बुधवारी (दि. 13) रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.

सतीश लोहकरे (रा. इमारत क्रमांक 428, संत तुकारामनगर, सिध्दी विनायक गणपती समोर, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी 57 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला रस्त्याने जात असताना त्यांना क्रिकेटचा बॉल लागला. तो बॉल घेऊन महिला त्यांच्या घरी गेल्या. हा राग मनात धरून सतीश लोहकरे याने महिलेचा हात पिरगळून त्यांना लाथ मारली. शिवीगाळ करत लज्जास्पद गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने तक्रार देताच सतीश लोहकरे याच्याविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोचरे करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button