breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुख्य समाजविकास अधिकारी पद मंजुरीसाठी आयुक्तांचे राज्य सरकारला पत्र

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मुख्य समाजविकास अधिकारी (गट अ) अभिनामाचे पद मंजूर आहे. त्याची अंमलबजावणी करण्याकरता पद मंजुरी घेण्यासाठीचे पत्र आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी राज्य शासनाकडील नगरविकास विभागाच्या मुख्य प्रधान सचिव क्रमांक दोन यांना पाठविले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर नागरवस्ती विकास योजना विभागासाठी मुख्य समाजविकास अधिकारी (गट अ) या अभिनामाचे पद 2016 रोजीपासून मंजूर आहे. त्याचे सेवा प्रवेश नियम मान्यतेसाठी शासनाकडे संदर्भिय क्रमांक 1 अन्वये प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तथापि, या पदाला शासनाकडून अद्याप मान्यता मिळण्याची आपेक्षा आहे.

महापालिका ठराव क्रमांक 866 दि. 20/05/2016 अन्वये महासभेच्या मंजूर पदाला अंतिम मान्यतेसाठी शासन दरबारी पत्रव्यवहार झाला आहे. त्यामुळे मुख्य समाजविकास अधिकारी (गट अ) पदावर नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांना लवकरच पदोन्नती मिळणार आहे. कारण, ऐवले हे एकमेव अधिकारी मुख्य समाजविकास अधिकारी (गट अ) या पदाची शैक्षणिक अर्हता धारण करतात. याशिवाय, महापालिकेतील 99 टक्के अधिका-यांना शासन निर्णयाच्या अधीन राहून तसेच न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नत्या देण्यात आलेल्या आहेत. शासन निर्णयाच्या अधीन राहून अधिकारी ऐवले यांना देखील पदोन्नती लवकरच दिली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button