breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकातील काँग्रेसच्या खेळीमागे मायावती?

लखनऊ: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देण्याची तयारी दाखवून कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. मात्र, काँग्रेसच्या या खेळीमागे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती असल्याचे सांगितले जाते.

मायावती यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना फोन केला होता. आघाडी करून सरकार स्थापन करण्याचा सल्ला त्यांनीच सोनिया गांधी आणि जेडीएस प्रमुख एच. डी. देवेगौडा यांना दिला होता, असे समजते. बसपने निवडणुकीआधी जेडीएससोबत आघाडी केली होती आणि वीस जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मायावती यांनी निवडणूक प्रचारादरम्यान जेडीएस नेत्यांसमवेत जाहीर सभाही घेतली होती. या निवडणुकीत बसपच्या मतांच्या टक्केवारीत घट झाली असली तरी, राज्यात पहिल्यांदाच पक्षाने एक जागा जिंकली आहे. मात्र, अवघी एक जागा जिंकलेल्या बसपच्या प्रमुख मायावती या खऱ्या ‘किंगमेकर’ ठरल्या आहेत. जेडीएसला पाठिंबा देऊन भाजपचे सत्तास्थापनेचे स्वप्न भंग करणाऱ्या काँग्रेसच्या खेळीमागे मायावतीच असल्याचे सांगितले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button