breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकच्या आमदारांनो केरळमध्ये या ; पर्यटन विभागाची ऑफर

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, तो बहुमतापासून दूर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसनं तिसऱ्या क्रमांकावरील जेडीएसच्या साथीनं सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आता कर्नाटकात फोडाफोडीचं राजकारण होण्याची दाट शक्यता आहे. त्रिशंकू विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांनी केरळमधील सुंदर आणि सुरक्षित रिसॉर्ट्समध्ये यावं, असं ट्विट केरळच्या पर्यटन विभागानं केलं. मात्र काही वेळानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं आहे.

काँग्रेसचे जेडीएसच्या साथीनं सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर भाजपानंही सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदारांची पळवापळवीदेखील होऊ शकते. अशा परिस्थितीत अनेकदा राजकीय पक्ष आमदारांना सुरक्षित स्थळी घेऊन जातात. हेच लक्षात घेऊन केरळच्या पर्यटन विभागानं नवनिर्वाचित आमदारांना ‘कूल’ ऑफर दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button