breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

एसएससी बोर्डात तरुणीने पेटवून घेतले

पुणे –  प्रियकराबरोबर वाद झाल्यानंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एसएससी) तिसर्‍या मजल्यावरील स्वच्छता गृहात तरुणीने पेट्रोल टाकून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. तरुणी यात 80 टक्के भाजली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

कोंढव्यात राहणारी ही 25 वर्षीय तरुणी आहे. एसएससी बोर्डातील लिपीक तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. मात्र, त्याने दीड वषार्र्ंपूर्वी दुसर्‍याच मुलीसोबत विवाह केला. यावरून त्यांच्यात वाद सुरू होते. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तरुणी एसएससी बोर्डात आली. थेट तरुण काम करत असलेल्या तिसर्‍या मजल्यावर गेली. तिचे तरुणासोबत वाद झाले. त्यानंतर थेट तरुणी स्वच्छतागृहात गेली. तसेच, अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. तरुणीने पेटवून घेतल्याचे समजताच एकच गोंधळ उडाला. येथील कर्मचारी व अधिकार्‍यांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. तसेच, पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेतली. यात तरुणी 80 टक्के भाजली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद करण्यात आली आहे. तक्रार देण्यास कोणी आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक अप्पासाहेब वाघमळे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button