breaking-newsपिंपरी / चिंचवड

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीतून पथविक्रेत्यांना मिळणार आर्थिक मदत

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील पथविक्रेते, हातगाडीवाले, फेरीवाला, पथारी अशा छोट्या व्यावसायिकांना प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीतून व्यावसायिक कर्ज देवून त्यांना स्वावलंबी बनविण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील दहा हजारांहून अधिक पथविक्रेत्यांना लाभ मिळणार असून या योजनेच्या अमंलबजावणीस महापालिकेकडून समिती गठीत करण्यात अली  आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी नुकतीच बैठक घेतली.

शहरातील पथविक्रेते, हातगाडीवाले, पथारी हे नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे स्वस्त दरात वस्तू व सेवांची उपलब्धता करण्यात भूमिका बजावित असतात. त्यात पथविक्रेते, फेरीवाले, पथारी, हातगाडीवाले भाजीपाला, फळे, खाद्य पदार्थ, आदी विविध वस्तूची विक्री करीत असतात. कोविड-19 या साथीच्या महामारीत फेरीवाला, पथविक्रेता हे आर्थिक संकटात सापडले आहेत. लाॅकडाऊनच्या टाळेबंदीत अनेकांवर उपासमारीची वेळ आलीय. काहींचा उदरनिर्वाह त्या व्यवसायांवर होता. अनेकांचे भांडवल लाॅकडाऊनमध्ये शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्याची आवश्यकता आहे.

केंद्र शासनाच्या सुचनेनूसार पिंपरी चिंचवड महापालिका नागरवस्ती विभागाकडून पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधीतून पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची अमंलबजावणी करण्यात येत आहे. त्यातून प्रत्येक पथविक्रेत्यांना दहा हजार रुपयाचे खेळते भांडवल कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातील दहा हजारांहून अधिक पथविक्रेते, फेरीवाले, हातगाडीवाले आदींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याकरिता महापालिका सात जणांची समिती गठीत केली आहे.

त्यात महापालिकेचे आयुक्त हे समितीचे अध्यक्ष असून बॅंकेचे अधिकारी, उपायुक्त, नागरवस्ती, पथविक्रेता संघटनेचे पदाधिकारी, एन. बी. एफ. सी. आणि सी. एल. एफ.चे सदस्य राहणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने या बाबतीत बैठक घेतली असून या बैठकीला टपरी पथारी हातगाडी पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे हे उपस्थित होते. या योजनेचा लाभ पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व टपरी पथारी  हातगाडी गाळेधारकांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी प्रल्हाद कांबळे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button