breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

एटीएसने अटक केलेल्याला मुंबईत घडवायचा होता हल्ला

  • गुजरात आणि उत्तरप्रदेशही होते निशाण्यावर 

मुंबई – दहशतवादी संघटनेशी लागेबांधे असल्यावरून महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी फैझल हसन मिर्झा (वय 32) याला अटक केली. त्याने मुंबईत दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट रचला होता. याशिवाय, गुजरात आणि उत्तरप्रदेशातील ठिकाणेही त्याच्या निशाण्यावर होती.

अटकेनंतर मिर्झाची कसून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीतून त्याने रचलेल्या कटासंबंधी माहिती एटीएसच्या हाती आली आहे. दहशतवादी कारवाया आणि गुन्हेगारी जगताशी असलेल्या संबंधांवरून तपास यंत्रणांच्या रडारवर शारजामध्ये राहणारा फारूक देवडीवाला हा आरोपी आहे. त्याच्या सूचनेवरून मिर्झा काही महिन्यांपूर्वी नोकरी करण्याचे ढोंग करून शारजाला गेला. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार छोटा शकील याच्याशी संबंध असणाऱ्या फारूकने मिर्झावर दहशतवादी कारवाया आणि विशेषत: आत्मघाती हल्ले घडवण्याची जबाबदारी सोपवली. मिर्झा इतर साथीदारांसमवेत हल्ल्यांच्या कटाची अंमलबजावणी करणार होता.

दरम्यान, फारूकने उपलब्ध करून दिलेल्या विमान तिकिटांच्या आधारे मिर्झा मुंबईहून शारजात दाखल झाला. फारूकने त्याला तिथून दुबईला नेले. दुबईतून त्याला पाकिस्तानात पाठवण्यात आले. नंतर पाकिस्तानी गुुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने तो दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळावर पोहचला. दहशतवादाचे प्रशिक्षण घेऊन तो मुंबईत परतला. दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी तो म्होरक्‍यांच्या आदेशाची प्रतीक्षा करत होता. मात्र, दहशतवादी हल्ले घडवण्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button