breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ई क्षेत्रीय कार्यालयात मीटर निरिक्षक महिलेचा “काळाबाजार”

  • वाढीव दराने पाणी मीटरची विक्री
  • नागरिकांना घातला लाखोंचा गंडा

पिंपरी – महापालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पाणी पुरवठा विभागातील मिटर निरिक्षक महिलेच्या पतीकडून बेकायदेशीरपणे खराब कंपनीचे पाणी मीटर जादा शूल्क आकारून विक्री केले जात आहेत. पालिका प्रशासनाच्या सहकार्याने लाखो रुपयांचा गैरकारभार झाल्याने अधिकारी संबंधित महिलेच्या दाबावाला बळी पडत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी चौकशी करून संबंधित महिलेला तातडीने निलंबित करावे, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तिव्र भूमिका घेण्याचा सामुदायीक इशारा राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका विनया तापकीर यांनी बुधवारी (दि. 11) पत्रकार परिषदेत दिला आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयात मिटर निरिक्षक शीतल गायकवाड- चतुर्वेदी या काम करतात. त्यांचे पतींचा पाणी मीटर विक्रीचा व्यवसाय असून त्यांनी बेकायदेशीर पध्दतीने वाढीव शूल्क आकारून नागरिकांना पाणी मीटरची विक्री केली आहे. या प्रभाग कार्यालयांतर्गत भागातील बांधकाम व्यवसायीकांकडून लाखो रुपये उकळले जात आहे. या महिलेच्या आडून तिचा पती पालिकेतील सर्व कामे दबाव तंत्राचा वापर करून करवून घेत आहे. त्यामुळे नागरिकांची लूट होत असून यात क्षेत्रीय अधिका-यांचाही सहभाग आहे. महिलेच्या विरोधात तक्रार दिल्यास महिला आयोगाकडे जाण्याची धमकी ही महिला अधिका-यांना देत आहे. त्यामुळे तिच्याविरोधात तक्रार देण्याचे धाडस देखील कोणी करत नसल्याचे नगरसेविका विनया तापकीर यांनी सांगितले.

 

या प्रकरणात संबंधित महिला आणि तिचा पती दोघांनी नागरिकांकडून, बांधकाम व्यावसायिकांकडून लाखो रुपये उकळले आहेत. पाणी मीटरच्या नावाखाली बांधकाम व्यावसायिकांकडून वाढीव रक्कमेचे धनादेश स्वतःच्या नावाने स्वीकारले आहेत. यामध्ये प्रशासनाची चूक आहे. क्षेत्रीय कार्यालय ते आयुक्त अशी साखळी असून यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवानघेवान होत असेल. महापालिकेत जर पारदर्शक कारभार होत असेल तर आयुक्तांनी उद्या गुरूवारी (दि. 12) मीटर निरिक्षक महेलेवर निलंबनाची कारवाई करावी, असे आव्हान विरोधी पक्ष नेते साने यांनी दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button