breaking-newsराष्ट्रिय

आता पॅसेंजर ट्रेन मधून होणार मुंबईला दूध पुरवठा

  • पश्‍चिम रेल्वेची मिल्क कंटेनर आणण्यासाठी विशेष परवानगी 
मुंबई: दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईला होणारा दुध पुरवठा रोखत असून त्याच्या पार्श्वभूमीवर पश्‍चिम रेल्वेने 59440 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल या पॅसेंजर ट्रेनने मिल्क कंटेनर आणण्याची विशेष परवानगी दिली असुन मुंबईत कुठेही दूध टंचाईची समस्या निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
59440 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल या पॅसेंजर ट्रेनला मिल्क कंटेनर जोडण्यात येणार आहेत.
44 हजार लीटर क्षमतेचे प्रत्येकी 12 मिल्क कंटेनर जोडता येतील. पुढच्या काही दिवसांसाठी पश्‍चिम रेल्वेने ही परवानगी देण्यात आली आहे. पुण्यात हडपसर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोकूळ दुधाचा टॅंकर फोडला होता. तसेच सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती येथे स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी दुधाचे टॅंकर फोडून दूध रस्त्यावर ओतले होते. काही ठिकाणी दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून दिल्या होत्या. मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखणे हा या आंदोलनामागे हेतू आहे.मात्र मुंबईत दुधाचा पुरवठा सुरळीत सुरु आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत तरी स्वाभिमानला त्यात यश मिळाले नाही, कारण मंगळवारी मुंबईत कुठेही दूधाची टंचाई जाणवली नाही. दूध ओतून देण्याचे प्रकार कुठे घडू नयेत यासाठी पोलिसांनी मुंबईच्या प्रवेशद्वारापासून ते दूध केंद्रापर्यंत प्रत्येक गाडीला संरक्षण दिले होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button