breaking-newsमनोरंजन

अक्षय खन्ना वाढत्या मानधनावर ठाम

अक्षय खन्ना बऱ्याच दिवसात कोणत्याच सिनेमामध्ये दिसलेला नाही. तो लवकरच तो “सेक्‍शन 375- मर्जी या जबरदस्ती’ मध्ये तो दिसणार आहे, असे समजले होते. मात्र निर्मात्यांबरोबर मानधनांच्या मुद्दयावरून झालेल्या भांडणामुळे त्याला या सिनेमातून बाहेर काढण्यात आल्याचेही समजले आहे. करिअरच्या ग्राफमध्ये थोडा ब्रेक लागल्यानंतरही अक्षय खन्ना अजूनही डिमांदिंग पोजिशनला असल्यासारखा वागतो आहे, हे पाहून आश्‍चर्यच वाटते.

अक्षय खन्नाने आपल्या मानधनाच्या बाबतीत कधीच तडजोड केलेली नाही. त्याने सातत्याने आपल्या मानधनाच्या आकड्यांमध्ये वाढच केली आहे. त्याने कमी मानधन घ्यायला पाहिजे असे सुचवणाऱ्यांना अक्षय “खरे तर मी दुप्पट मानधन घ्यायला पाहिजे.’ असे सुनावतो. त्याच्या या ऍप्रोचमुळे अनेक निर्माते नाराज झाले आहेत.

काही निर्मात्यांना त्याचे मानधन परवडत नाही त्यामुळे ते त्याला घासाघीस करून तयार करण्या ऐवजी सिनेमातच घ्यायला कचरत आहेत. कुमार मांगल आणि त्यांचा मुलगा अभिषेक पाठक यांचा “सेक्‍शन 375′ यापूर्वीच फ्लोअरवर यायला पाहिजे होता. पण अक्षयने याच तारखा अन्य सिनेमाला देऊन ठेवल्या होत्या. त्यामुळे त्याच्या कॉन्ट्रॅक्‍टवर परिणाम झाला आणि “सेक्‍शन 375′ पण रखडली. आता अक्षयला या सिनेमातूनच काढले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button