breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सर्वपक्षीय आंदोलनात मीडियासमोर पोझ देण्यासाठी उडाली झुंबड

  • श्रेय वादावरुन गटा-तटा विभागले सर्वपक्षीय विरोधकांचे आंदोलन
  • विरोधकांमध्ये ताळमेळ नसल्याने आंदोलनाचा उडाला फज्जा 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवडकर शास्तीकर, अनधिकृत बांधकाम, रिंगरोड, रेडझोन यासह आदी प्रश्नामुळे हैराण झाले आहे. हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देवून सत्ताधारी भाजपने सत्ता मिळविली. मात्र, मागील साडेचार वर्षात मुख्यमंत्र्यानी वारंवार आश्वासने देवूनही प्रश्न जैसे थे आहेत. या प्रश्नावरुन राष्ट्रवादी, शिवसेना, काॅंग्रेस, मनसे, स्वराज अभियान, शेकाप, संभाजी बिग्रेड, छावा संघटनासह सामाजिक संघटनाचे आज (सोमवारी) दुपारी 3 वाजता महानगरपालिकेला सर्वपक्षीय घेराव आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. परंतू, सर्वपक्षीय आंदोलकांमध्ये समन्वय नसल्याने केवळ मीडियासमोर येवून घोषणा देत फोटोला पोझ दिल्या. अनेकांनी गट-तट करुन आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे आंदोलनात ताळमेळ न राहिल्याने विरोधकांचे भरकटल्याचे दिसून आले. 

पिंपरी-चिंचवडकर नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न कित्येक दिवसापासून प्रलंबित आहेत. त्या प्रश्नावर सर्वच पक्षातील नेत्यांनी राजकारण करुन स्वताःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पिंपरी-चिंचवडचे अनधिकृत बांधकाम नियमितीकरण, सरसकट शास्तीकर माफी, रिंगरोड रद्द करणे, रेडझोन कमी करणे यासह बाधित लोकांचे पुनवर्सन करणे, हे प्रश्न आजही सुटलेले नाहीत. काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेस आघाडी सरकारच्या काळातही हे प्रश्न प्रलंबित राहिले. तर आज भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये देखील हे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडकरांना हे प्रश्न निकाली काढतो, तुम्ही आम्हाला एकहाती सत्ता द्या, असे आवाहन केले. त्यावर महापालिकेत एकहाती सत्ता येवूनही हे प्रश्न प्रलंबित आहे.

याच प्रश्नावरुन भाजप विरोधात सर्वपक्षीय आंदोलनात पिंपरी-चिंचवडमध्ये छेडले जात आहे. या आंदोलनात महापालिकेला घेराव घालून निषेध करण्यात येणार होता. परंतू, घेराव घालण्यास आणलेली गाजर कार्यकर्ते खात होती. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्तेही गट-तट करुन वावरत होते. आंदोलनात एकमेकांचा समन्वय नसल्याने मीडियासमोर फोटो काढण्यास सर्वांची झुंबड उडाली होती. अहिल्या होळकरांच्या पुतळा वगळता अन्य महापुरुषाच्या पुतळ्याला हार घालणेही विरोधक विसरुन गेले. काही नगरसेवकांनी सर्वाधिक चमकोगिरी करताना दिसत होते. त्यामुळे भाजप विरोधी आंदोलनात विरोधकांच्या समन्वयाअभावी हे आंदोलन फसल्याचे दिसून आले.

या आंदोलनात विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेनेचे शहराध्यक्ष योगेश बाबर, संभाजी बिग्रेडचे अभिमन्यू पवार, मारुती भापकर आदी विविध पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button