breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपचे डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे राहूल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य, पिंपरीत काँग्रेसकडून निषेध

पिंपरी, (महाईन्यूज) – भारतीय संस्कृतिचा ठेका घेतल्यासारखे भाजपा वागत आहे, तर दुसरीकडे भारतीय संस्कृती पायदळी तुडविणारे वक्तव्य भाजपाचेच खासदार करत आहेत. हे निषेधार्ह आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्याविषयी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेले वक्तव्य म्हणजे सत्तेची मस्ती आहे. असे बेताल वक्तव्य करणा-या डॉ. स्वामी यांना सरकारने गजाआड करावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली.

कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारे भाजपाचे खासदार डॉ.  स्वामी यांचा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग आणि पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात तीव्र निषेध करण्यात आला. डॉ. स्वामी यांच्या प्रतिमेस महिलांनी काळे फासले व जोडे मारले. यावेळी कॉंग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष गौतम आरकडे, अनुसूचित जाती विभाग शहराध्यक्ष बाबा बनसोडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या सचिव बिंदू तिवारी, युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस मयूर जैसवाल, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, असंघटीत कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, लक्ष्मण रूपनर, पांडुरंग पांढारकर, किशोर कळसकर, हिरामण खवळे, विशाल कसबे, कैलास वाल्हेकर, उषा खवळे, गंधारा वाघमारे, शकुंतला क्षिरसागर, लक्ष्मण पगारे, रामदास भंडलकर, किशोर आडागळे, अर्जून तुपे, शाम दाभाडे, डी.जी. जाधव आदी उपस्थित होते.

डॉ. स्वामी यांचा निषेध करताना गौतम आरकडे म्हणाले की, स्वामी यांनी दिल्लीतील माध्यमांमध्ये दिलेल्या मुलाखतीत खासदार राहुल गांधी यांच्याविषयी निंदाजनक अपशब्द वापरले आहेत. स्वामी यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश अनूसूचित जाती विभागाच्या वतीने राज्यातील ठिकठिकाणी पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्यात येत आहेत. स्वामी यांनी खासदार गांधी यांची जाहिर माफी मागावी. ज्या माध्यमाव्दारे त्यांनी टिका केली त्या माध्यमात माफीचे वृत्त प्रसिद्ध करावे, अन्यथा आंदोलन राज्यभर तीव्र करू, असा इशारा आरकडे यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button