breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चहाच्या टपरीवर आमदार होण्याचा संकल्प

  • आमदार लांडगे आणि सोनवणे यांची माहिती

पिंपरी – अपेक्षित पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. हताश मन:स्थितीत चहाच्या टपरीवर आमची भेट झाली आणि तेव्हा झालेल्या चर्चेत कोणत्याही परिस्थितीत आमदार व्हायचेच, असा निर्धार केला. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत कार्यकर्त्यांचे परिश्रम व जनतेच्या आशीर्वादामुळे आम्ही दोघेही आमदार होऊ शकलो, अशी भावना भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे व जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी व्यक्त केली.

जुन्नर तालुका मित्र मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त भोसरीतील लांडगे नाटय़गृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जुन्नर तालुक्यात एका लग्नाच्या निमित्ताने भेट झाली. तेथे चहाच्या टपरीवर तत्कालीन राजकीय परिस्थितीवर आम्ही चर्चा केली. खूप आव्हाने होती.

मात्र, काहीही करून आमदार होण्याचा संकल्प केला. प्रतिकूल परिस्थितीत बऱ्याच संघर्षांनंतर आमदारकी मिळवली, असे लांडगे व सोनवणे यांनी सांगितले.  या समारंभात पांडुरंग महाराज घुले यांना जुन्नरभूषण विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिवाजीराव चाळक, मंगेश आमले, बाळकृष्ण नेहरकर, अक्षय बोऱ्हाडे, राहुल खर्गे आदींचा सत्कार करण्यात आला. खासदार शिवाजीराव आढळराव, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, महापौर राहुल जाधव, माजी आमदार विलास लांडे, अतुल बेनके आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांकडून निमंत्रण

राज्यात मनसेचा मी एकमेव आमदार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून आपल्याला पक्षप्रवेशाचे अनेकदा निमंत्रण दिल्याचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी या कार्यक्रमात सांगितले. मतदारसंघातील कामे झाली पाहिजेत, यासाठी आपला प्राधान्यक्रम असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button