breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भिकु वाघेरेपाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहील्यामुळे तरुणाला बेदम मारहाण

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर दिवंगत भिकु वाघेरेपाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहील्यामुळे एका तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि.14) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सतिश एकनाथ नाणेकर (वय – 50 वर्षे, रा- एकनिंदा निवास नानेकर वाडा शिवाजी पुतळा पिपंरीगांव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस फिर्याद दिली आहे.गणेश सुरेश वाघिरे, राजेश सुरेश वाघिरे , सुशिल श्रावण मोहन , (सर्व आरोपी राहणार नानेकर वाडा शिवाजी पुतळा पिपंरीगांव ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश वाघिरे , आरोपी सुशिल श्रावण मोहन यांनी मारुती वॅगनर (गाडी क्र एम एच 14 जी यु 9642) यांनी चारचाकी वाहनातून येवून फिर्यादी सतीश नाणेकर यांना “ तु भिकु वाघिरे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमास का आला होता, भिका – या तुझी लायकी आहे काय ” असे म्हणुन शिवीगाळ करत फिर्यादी सतीश नाणेकर यांना बेदम मारहाण करत आरोपी गणेश वाघिरे याने लोखंडी रॉडने फिर्यादी सतीश नाणेकर यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर मारुन जखमी केले व ” तु आमचे नांदी लागु नको तुला खल्लास करील ” अशी धमकी दिली.आरोपीविरूध्द पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button