पिंपरी / चिंचवड

पान टपरी मधून प्रतिबंधित गुटखा विकणा-या तरुणाला अटक

पिंपरी l प्रतिनिधी

पान टपरी मध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 12) सकाळी साडेअकरा वाजता छावा पान सेंटर, पिंपळे निलख येथे करण्यात आली.

आकाश शिवराज काजगर (वय 26, रा. पिंपळे निलख) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सुरेश जायभाये यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश काजगर याची पिंपळे निलख येथील शिल्पा रेस्टोरंट अँड बार जवळ छावा पान सेंटर ही पान टपरी आहे. त्याने त्याच्या टपरीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी टपरीवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये आठ हजार 433 रुपयांचा गुटखा जप्त करत आरोपी आकाश याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button