TOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

योगगुरू रामदेवबाबांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई | योगगुरू रामदेवबाबांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या भेटीचे फोटो खुद्द देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. त्यांच्या भेटीवरून तर्क-वितर्क सुरू झालेले असतानाच आता रामदेवबाबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. तसेच, रामदेवबाबांनी मुख्यमंत्र्यांना बाळासाहेब ठाकरेंचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारीदेखील म्हटल्यामुळे यावरून नव्याने राजकीय चर्चा सुर होण्याची शक्यता आहे.

शिवसेना विरुद्ध शिंदे गट वादात भर?

एकीकडे राज्यात आधीपासूनच खरी शिवसेना कुणाची? शिवसेनेचं निवडणूक चिव्ह असलेला धनुष्यबाण कुणाचा? यावरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातला हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. त्यातच आता योगगुरू रामदेवबाबा यांनी एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरेंचे राष्ट्रीय उत्तराधिकारी म्हटल्यामुळे या वादात अधिकच भर पडण्याची शक्यता आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button