breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कामगारांच्या आरोग्यासाठी ‘डब्ल्युटीई इन्फ्रा’चा विधायक उपक्रम

  • कंपनीतील २४५ कामगारांना कोविड मोफत लसीकरण
  • संभाजीनगर येथील धनश्री हॉस्पिटल व्यवस्थापनाचे सहकार्य

पिंपरी । प्रतिनिधी
पर्यावरण व सांडपाणी प्रक्रिया क्षेत्रात काम करणाऱ्या डब्ल्युटीई इन्फ्रा प्रो. प्रा. लि. कंपनीतील सुमारे २४५ कामगार व कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. कामगारांचे आरोग्य जपण्याच्या दृष्टीने हा उपक्रम हाती घेण्यात आला.
चाकण, सावरदरी येथे डब्ल्युटीई इन्फ्रा प्रो. प्रा. लि. चे मुख्यालय आहे. याठिकाणी सुमारे २४५ कामगार व कर्मचारी काम करीत आहेत. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कंपनीतील सर्वच कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.
कंपनीचे संचालक नितीन घाडगे यांना लसीकरण करुन या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी व्यवस्थापकीय संचालक अशोक कुलकर्णी, संचालक विनोद गोळे, संचालक रघुनाथ रणपिसे आदी उपस्थित होते.
सोशल डिस्टंटसिंगच्या नियमाचे पालन करीत लसीकरण करण्यात आले. २४५ कामगार व कर्मचाऱ्यांना पहिला डोस दिला आहे. आता प्रशासनाच्या नियमानुसार दुसरा डोसही देण्यात येईल. कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक कामगार आरोग्यदृष्या सुरक्षित रहावा, असा आमचा हेतू आहे, अशी माहिती मानव संसाधन विभागाच्या मोना पंडित यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button