TOP NewsUncategorizedक्रिडामुंबई

वाह रे पट्ट्या! कॅमरून ग्रीनच्या बोटाला दुखापत तरी खेळला 157 चेंडू, मुंबई इंडियन्सने शेअर केला फोटो

मुंबई : आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने विक्रमी किंमतीला विकत घेतलेल्या कॅमरून ग्रीनच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याच्या बोटाचे हाड मोडले आहे. या दुखापतीनंतरही त्याने तब्बल 157 चेंडू खेळून काढले. मुंबई इंडियन्सने कॅमरून ग्रीनच्या हाताचा एक्स रेचा फोटो शेअर केला आहे.

ग्रीनच्या उजव्या हाताच्या बोटाला झालेली दुखापत गंभीर आहे. त्याच्यावर सर्जरी करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीवेळी त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. यामुळे आता मुंबई इंडियन्सची चिंता वाढली आहे. कॅमरून ग्रीनला एनरिच नॉर्थजेचा चेंडू बोटावर जोराद लागला होता. यानंतर बोटातून रक्तस्रावही झाला. या दुखापतीमुळे कॅमरूनला कसोटी मालिकेतून बाहेर पडावं लागलं. इतकंच नाही तर बीग बॅश लीगमधूनही त्याला नाव मागे घ्यावं लागलं आहे. यामध्ये कॅमरून पर्थ स्कॉचर्सच्या संघाकडून खेळतो.

कॅमरून ग्रीनने पहिल्या डावात 5 विकेट घेतल्या होत्या. आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांना बाद करून कारकिर्दीतील सर्वोत्तम अशी आकडेवारी नोंदवली होती. 27 धावा देऊन 5 गडी बाद केले होते. त्यानंतर फलंदाजी करताना 177 चेंडूत नाबाद 51 धावाही केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा हा स्टार खेळाडू आता बोटाच्या फ्रॅक्चरमुळे संघातून बाहेर आहे. फेब्रुवारी महिन्यात भारताविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेआधी तो तंदुरुस्त होईल आणि संघात निवडीसाठी उपलब्ध असेल अशी डॉक्टरांना आशा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button