breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

महाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ

मुंबई |

करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेवरील तणावही मोठ्या प्रमाणात वाढत असून अनेक ठिकाणी सुविधांची कमतरता जाणवत असल्याचं दिसत आहे. आरोग्य सुविधांचा अभाव पाहता राज्य सरकार येत्या काही दिवसांमध्ये लॉकडाउनसंबंधी निर्णय घेण्याची शक्यताही आहे. दरम्यान उस्मानाबादमध्ये अचानक रुग्णसंख्या वाढू लागल्याने बेड उपलब्ध होणं कठीण झालं आहे. रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर आली. घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात एका व्यक्तीने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना खूर्चीत बसवण्यात आल्याचं दिसत आहे. बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं दिसत आहे. यावेळी डॉक्टर आणि नर्स आपल्याला शक्य ती सर्व मदत रुग्णांना करण्याचा प्रयत्न करत आहेत. उस्मानाबादमध्ये रविवारी ६८१ नव्या रुग्णांची नोंद झाली. यावेळी सात रुग्णांचा मृत्यूदेखील झाला. राज्यात रविवारी एकूण ६३ हजार नवे रुग्ण आढळले. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकांनी पुणे, पालघर, भंडारासहित उस्मानाबादमध्येही ऑक्सिजन पुरवठ्याचा तुटवडा असल्याचा उल्लेख केला. उस्मानाबादमध्ये सध्या ४३०० अॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत.

वाचा- #Lockdown: राज्यात दोन-तीन दिवसांत कडक टाळेबंदी!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button