ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विप्रो पारीचा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोबत सामंजस्य करार

पिंपरी चिंचवड | विप्रो पारी आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (COEP) यांच्यात अद्ययावत उत्पादन व ऑटोमेशन तंत्रज्ञान केंद्र आणि रोबोटिक्स व ऑटोमेशन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (MOU) झाला. या करारावर स्वाक्षरी झाल्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली. रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक सिस्टीम, प्रगत सेन्सरी सिस्टीम आणि इंडस्ट्री 4.0 सह स्मार्ट फॅक्टरी यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑटोमेटेड मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम सोल्युशन्समध्ये जागतिक स्तरावर विप्रो पारी आघाडीवर आहे.

यावेळी विप्रो पारीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक कुमार, व्यवस्थापकीय संचालक रणजित दाते, रवी गोगिया, सीईओपीच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष प्रताप पवार, संचालक डॉ. बी.बी. अहुजा व विप्रो पारीचे व्यवस्थापनातील वरिष्ठ उपस्थित होते.

या सामंजस्य करारांतर्गत, विप्रो पारी कंपनी सीओईपीच्या मॅन्युफॅक्चरिंग सायन्सेस इमारतीतील नवीन इमारतीचे प्रायोजकत्व करेल. ही इमारत दोन मजल्यांची असेल. त्यात तळमजल्यावर मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी लॅब, शैक्षणिक वर्ग, संगणक प्रयोगशाळा असेल तर दोन्ही मजल्यांवर कार्यालये असतील. या इमारतीचे नाव ‘विप्रो पारी सेंटर फॉर ऍडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी’ असे असणार आहे.

याव्यतिरिक्त, विप्रो पारी रोबोटिक्स आणि ऑटोमेशन ऍप्लिकेशन्सवर केंद्रित असलेल्या एकात्मिक उत्पादन प्रयोगशाळेच्या स्थापनेला समर्थन देईल. विप्रो पारी संस्थापक मंगेश काळे यांच्या सन्मानार्थ या प्रयोगशाळेला ‘मंगेश काळे रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लॅब’असे नाव दिले जाईल. या केंद्राद्वारे, विप्रो पारी उत्पादन तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करणारा अभ्यासक्रम आणि प्रयोगशाळा तयार करण्यात मदत करेल. प्रकल्प आणि कारखाना भेटीद्वारे प्राध्यापक आणि विद्यार्थी त्यात सहभागी होवू शकतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button