breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार; उदयनराजे भोसले मुंबईला रवाना

सातारा: राज्यात सत्तेची उलथापालथ झालेली असताना आता नजरा भाजपाच्या सत्तेत येण्याच्या लागल्या असून कोणाला कोणतं खातं मिळणार यावर चौकाचौकांमध्ये गप्पा सुरू झाल्या आहेत. साताऱ्यात भाजपाचे दोन तर शिवसेनेचे म्हणजेच एकनाथ शिंदे गटाचे सुद्धा दोन आमदार आहेत. भाजपाचे जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले हे तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे शंभुराज देसाई ,महेश शिंदे हे आमदार असून या मध्ये मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार यावर सातारा जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. महेश शिंदे आणि जयकुमार गोरे हे दोन्ही आमदार देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात तर भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा फडणवीसांसोबत सलगी राखून आहेत यामुळे या तिघांमध्ये सध्या मंत्रिपदासाठी रस्सीखेच असणार आहे.

शंभुराज देसाई हे एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत मर्जीतले मानले जातात त्यामुळे शंभुराज यांना कॅबीनेट ठरलेलंच आहे अशी चर्चा असून पालकमंत्रीपद सुद्धा शंभुराज देसाई यांच्याकडे राहिल असे बोलले जात आहे. या सर्वामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांचा रोल महत्त्वाचा मानला जातोय खासदार उदयनराजे हे सरकार कोसळल्यानंतर लगेच सकाळीच मुंबईसाठी रवाना झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये नक्की कोणासाठी शब्द टाकणार हे पाहणं महत्वाचं आहे. शंभुराज देसाई हे उदयनराजे भोसले यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत, यामुळे शंभुराज देसाई यांना पालकमंत्रीपद देण्यात यावं अशी मागणी उदयनराजे भोसले यांची राहणार असल्याचं दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. तसंच आमदार जयकुमार गोरे हे कोणतं खातं मिळवण्यात यशस्वी होतायेत हे पाहणं सातारा जिल्ह्यासाठी औस्तुक्याचं असणार आहे.

जयकुमार गोरे यांना नुकतच भाजपाचं जिल्हाध्यक्ष करण्यात आलंय यामुळे साता-यात राष्ट्रवादी संपवण्यासाठी जयकुमार गोरे यांना मंत्रीपद देऊन त्यांना ताकत देण्याचा प्रयत्न फडणवीस यांचा राहील असा अंदाज व्यक्त केले जातोय. महेश शिंदे यांना सुद्धा एखादं राज्यमंत्रीपद दिलं‌ जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र महेश शिंदे हे मंत्रिपदाला सध्या इच्छुक नसल्याचंच बोल्ल जातय. मंत्रिपदाच्या फिल्डींसाठी शिवेंद्रराजे आणि त्यांचे कार्यकर्ते मुंबई मध्ये पोहोचल्याचं सांगण्यात येत असुन सहकारमंत्रीपद मिळविण्यासाठी शिवेंद्रराजे भोसले मैदानात उतरल्याच्या चर्चा साता-यात आहेत. मात्र उदयनराजे भोसले कोणासाठी शब्द फडणवीसांना टाकतायेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. फडणवीस आणि उदयनराजे यांची घनीष्ठ मैत्री ही महाराष्ट्राला माहित आहे, यामुळे उदयनराजेंचा शब्द हा सातारा जिल्ह्याला मंत्रिपदासाठी महत्त्वाचा असेल हे मात्र नक्की आहे. भाजपाच्या या सत्तेत साताऱ्यात नक्की किती मंत्रिपदं असणार हे येणा-या काही काळात करणार असलं तरी जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचे चित्र सध्या पहायला मिळतय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button