breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘मोदीजींना कोणी अडवलंय, त्यांनी वायनाडमधून लढावं…’ ; प्रियंका गांधी

Priyanka Gandhi राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला आहे. ते रायबरेलीचे खासदार असतील. काँग्रेसने प्रियंका गांधी यांना वायनाडमधून पोटनिवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियंका उमेदवार होताच काँग्रेसने पंतप्रधान मोदींना वायनाडमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे.

काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले, मोदीजींनीही वायनाडमधून निवडणूक लढायला यावे, त्यांना कोण रोखत आहे? वायनाड सोडून रायबरेलीचे खासदार राहण्याच्या राहुल गांधींच्यानिर्णयाचा संदर्भ देत पवन खेडा म्हणाले, “हा निर्णय आम्हा सर्वांना आवडला. संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली आहे.”असे त्यांनी म्हटले. वायनाडमधील भाजपच्या उमेदवाराबद्दल ते म्हणाले, भाजपचा कोणताही नेता तेथे निवडणूक लढवण्यासाठी येऊ शकतो, वायनाडमध्ये पीएम मोदीही निवडणूक लढवण्यासाठी येऊ शकतात, त्यांना निवडणूक लढवण्यापासून कोण रोखत आहे. वाराणसीत संघर्ष करून त्यांनी विजय मिळवला आहे” असे म्हणत त्यांनी खोचक टोला देखील लगावला.

हेही वाचा   – ‘अजित दादांना हाती घेऊन शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न’; बच्चू कडूंचं विधान

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी काँग्रेसच्या बैठकीनंतर जाहीर केले होते की, राहुल गांधी रायबरेलीचे खासदार राहतील, ते वायनाडची जागा सोडतील. काँग्रेस वायनाडमधून प्रियंका गांधी यांना उमेदवारी देणार आहे. या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी मंगळवारी सकाळी वायनाड मतदारसंघातून आपला राजीनामा लोकसभेकडे पाठवला आहे. दुसरीकडे प्रियांका गांधी यांनीही पक्षाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

2019 प्रमाणे यावेळीही राहुल गांधींनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती. राहुल गांधींनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागा जिंकल्या. तथापि, 2019 मध्ये, त्यांनी अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवली, ते वायनाडमध्ये विजयी झाले, तर अमेठीमध्ये ते स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले. यावेळी काँग्रेसने अमेठीतून राहुल यांच्या जागी केएल शर्मा यांना तिकीट दिले होते. केएल शर्मा यांनी यावेळी स्मृती इराणी यांचा सुमारे दीड लाख मतांनी पराभव केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button