breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘आंबेडकरी विचारांच्या रक्षणाची लढाई लढतानाच चुकून…’; जयंत पाटील आव्हाडांच्या मदतीला सरसावले

Jitendra Awad And Jayant Patil | मनुस्मृतीच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमातील सहभागाप्रकरणी अनेक राजकीय नेत्यानी विरोध केला. यामुळे मागील काही दिवसांपासून राजकारण चांगलंच तापले आहे. बुधवारी 29 मे 2024 रोजी मनुस्मृती दहन करण्याकरिता महाड येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पोहचले होते. मात्र त्यानंतर त्यांच्या एका कृतीमुळे  अडचणीत सापडले आहेत.

मनुस्मृती लिहिलेले पुस्तक फाडत असताना, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. त्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून टिकेची झोड उठली. या प्रकरणी राज्यभरातील नेत्यांनी आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देखील सर्वांची माफी मागितली. यानंतर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत एक ट्वीट शेअर केले आहे.

“जितेंद्र आव्हाड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या रक्षणासाठी गेली पस्तीसहून अधिक वर्ष सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांचे संपूर्ण राजकीय व सामाजिक जीवन आंबेडकरी विचारांनी व्यापले आहे. आंबेडकरी विचारांच्या प्रत्येक व्यक्तीला जितेंद्र आव्हाड यांच्या बाबासाहेबांच्या वरील निष्ठा व प्रेमाविषयी कोणतीही शंका नाही,” असे जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा  –   टी-२० विश्वचषक महासंग्राम वेळापत्रक जारी; जाणून घ्या टीम इंडियाच्या सामन्याबद्दलची माहिती

“आंबेडकरी विचारांच्या रक्षणाची लढाई लढतानाच चुकून आव्हाड यांच्याकडून बाबासाहेबांचे पोस्टर नकळतपणे फाडले गेले. त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे माफीही मागितली आहे. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आंबेडकरी जनता कधीही बळी पडणार नाही, याचा मला पूर्ण विश्वास आहे,” असे म्हणत जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

“मनुस्मृतीचे दहन करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर अनावधानाने फाडले गेले आहे. या मागे आमचा कोणताही दुसरा हेतू नव्हता. मात्र, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, पण आम्ही हे मुद्दाम केलेले नाही. या संदर्भात विरोधकांना राजकारण करायचे असल्याने ते अनेक मागण्या करतील. मात्र, मी त्यावर काहीही बोलणार नाही. कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर माफी मागतो, “असे स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या घटनेवर दिले आहे.

आव्हाड पुढे म्हणाले, ” मी आजपर्यंत कधीही माफी मागितलेली नाही. मात्र, या वेळी माफी मागतोय, यावरुन ते माझ्या मनाला किती लागले हे लक्ष्यात आले असेल. त्यामुळे, महाराष्ट्राच्या जनतेने मला माफ करावे.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button