breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

ए आर रहमानला पुणे पोलिसांचा हिसका! पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई

पुणे : हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांनाही पोलीसांनी पुणेरी हिसका दाखवला आहे. ए आर रहमान गात असतानाच पुणे पोलिसांनी स्टेजवर एन्ट्री मारली आणि हा शो बंद पाडला. १० वाजल्यानंतरही हा शो सुरु असल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुण्यातील राजाबहाद्दूर मिल परिसरात रविवारी रात्री प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांचा शो होता. पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारीही कुटुंबीयांसह या कार्यक्रमाला हजर होते. परंतु रात्रीचे १० वाजल्यानंतरही कार्यक्रम सुरूच ठेवल्याने पोलिसांनी चक्क स्टेजवर जाऊन कार्यक्रम बंद करण्यास सांगितले.

रात्री १० वाजल्यानंतरही तुम्ही शो सुरूच कसा ठेवू शकता? रात्री १० नंतर कार्यक्रम करण्यास कोर्टाने मनाई केलेली आहे, हे तुम्हाला माहीत नाही काय? अशा शब्दात पोलीसांनी रेहमान यांना सुनावले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button