पिंपरी / चिंचवड

कारची रिक्षाला धडक लागल्याने दोघांना मारहाण करून लुटले

पिंपरी l प्रतिनिधी

कारची एका रिक्षाला धडक लागली. या कारणावरून रिक्षातील चार जणांनी मिळून कार मधील दोघांना मारहाण करून लुटले. ही घटना मंगळवारी (दि. 3) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास निगडी येथे घडली.

राशिद मेहबूब खान (वय 20, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋतिक अनिल जाधव (वय 22, रा. दत्तवाडी आकुर्डी), रोहित गायकवाड, प्रतिक यादव आणि एक अनोळखी इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खान हे त्यांच्या मित्रासह पिंपरी येथून तळेगावकडे कारमधून जात होते. त्यांच्या कारची धडक एका रिक्षाला लागली. त्या कारणावरून रीक्षामधील चार जणांनी मिळून फिर्यादी यांना कार बाजूला घेण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला मारहाण केली. दरम्यान फिर्यादी यांचा मित्र घटनास्थळावरून पळून गेला. आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याला मारहाण केली. तसेच फिर्यादी आणि त्यांच्या मित्राचे 38 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button