TOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

जेव्हा सलमान खान याने अथिया शेट्टी हिची मागितली जाहीर माफी, कारण जाणून बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने एका मुलाखतीत अथिया शेट्टी हिची माफी मागून सर्वांना आश्चर्यचकित केले. वर्षभरापूर्वी सलमान खान याने त्याचा भाऊ, अभिनेता आणि चित्रपट निर्माता अरबाज खान याच्या शो ‘पिंच 2’ मध्ये अभिनेत्रीची माफी मागितली तेव्हा तो चर्चेत आला होता. या शोमध्ये सलमान पाहुणा म्हणून पोहोचला होता. जिथे तो अरबाजसोबत अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने बोलला. तसेच सलमान यानेही चाहत्यांच्या ट्रोल केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली होती.

अरबाजचे परखड प्रश्न

अरबाज खान याने त्याच्या शोमध्ये सलमान खानसोबत सोशल मीडियाबाबत बरीच चर्चा केली. त्याने सलमान खान याला विचारले की, ‘त्याच्या सोशल मीडियावर त्याचे 117 दशलक्ष फॉलोअर्स आहेत पण तो ट्विटरवर फक्त 24 लोकांना आणि इंस्टाग्रामवर फक्त 25 लोकांना फॉलो करतो’. असे का?  त्यानंतर यावेळी अरबाज म्हणाला, ‘ते तीन पर्याय त्याला सांगावे लागतील. तो कोणाला फॉलो करत नाही हे त्याला सांगावे लागेल. कतरिना कैफ, संगीता बिजलानी आणि अथिया शेट्टी यांची नावे ऑप्शनमध्ये होती.

सलमान याने दिले उत्तर…

अरबाज खान याच्या या प्रश्नाला उत्तर देताना सलमान थोडा गोंधळला. त्याने संगीता बिजलानी हिचे पहिले नाव घेतो, परंतु अरबाज खान म्हणतो की, सलमान खान याचे उत्तर चुकीचे आहे. ज्यावेळी सलमान अथिया शेट्टीचे नाव घेतो, त्यावेळी तो योग्य उत्तर आहे, असे सांगतो. यानंतर सलमान कॅमेऱ्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो की सॉरी अथिया, मी आज तुला फॉलो करत आहे. 

सुनील शेट्टीचे मुलीसोबत खूप जमते

सुनील शेट्टी आपली मुलगी अथियासोबत खूप कम्फर्टेबल आहे आणि दोघेही वडील आणि मुलीपेक्षा मित्रांसारखेच वागतात. पण प्रत्येक नात्याप्रमाणेच दोघांमध्येही दुरावा निर्माण होतो. सुनील शेट्टी आपली मुलगी अथियाबाबत खूप सकारात्मक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अथिया लवकरच टीम इंडियाचा खेळाडू केएल राहुलसोबत लग्न करणार आहे. हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. याला सुनील शेट्टीची काहीही हरकत नाही, असे सांगितले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button