breaking-newsटेक -तंत्र

WhatsApp वर एकाच वेळी 50 लोकांना व्हिडीओ कॉल शक्य; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

मुंबई : लोकप्रिय सोशल मीडिया साईट असेलेल्या फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असतं. काही दिवसांपूर्वी फेसबुक आपल्या युजर्ससाठी Messenger Rooms फीचर घेऊन आलं होतं. या खास फिचर मार्फत 50 लोकांसोबत ग्रुप व्हिडीओ करणं सहज शक्य आहे. त्यानंतर कंपनीने हे फिचर इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप युजर्ससाठीही उपलब्ध करुन दिलं आहे. परंतु, फार कमी लोकांना हे फिचर वापरण्याच्या स्टेप्स माहिती आहेत. आज आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत.

सध्या ऑनलाईन क्लासेस सुरु आहेत. अनेक विद्यार्थी आणि शिक्षक यासाठी वेगवेगळ्या अॅप्सचा आधार घेत आहे. अशातच फेसबुकने उपलब्ध करून दिलेलं हे फिचर यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

WhatsApp Messenger Room हे फिचर वापरण्यासाठी युजर्सकडे लेटेस्ट वर्जन असणं अत्यंत आवश्यक आहे. याव्यतिरिक्त फेसबुक मेसेंजरचंही अपडेटेड वर्जन असणं गरजेचं आहे.

50 लोकांसोबत असा करा व्हिडीओ कॉल :

  1. सर्वात आधी WhatsApp ओपन करून कॉल करण्याचा ऑप्शन सिलेक्ट करा
  2. त्यानंतर Create a room ऑप्शनवर क्लिक करा.
  3. आता तुम्ही जसं Continue in Messenger ऑप्शन वर क्लिक कराल तेव्हा तुमच्यासमोर मेसेंजर अॅपची ओपन होईल.
  4. आता Try it, when prompted वर क्लिक करा.
  5. यानंतर Create Room वर क्लिक करा आणि रुमला एक नाव द्या.
  6. आता Send Link on WhatsApp वर क्लिक करा. यामुळे व्हॉट्सअॅप पुन्हा ओपन होईल.
  7. आता या रूमची लिंक कॉन्टॅक्ट किंवा ग्रुप्समध्ये शेअर करा.

WhatsApp वर Rooms जॉईन करण्याची पद्धत :

  1. WhatsApp वर पाठवलेल्या रूम लिंकवर क्लिक करा.
  2. ही लिंक मेसेंजर अॅप किंवा वेबसाइटवर ओपन होईल.
  3. आता रूम जॉईन करण्यासोबतच 50 लोक व्हिडीओ किंवा ऑडियो कॉल करू शकतात.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button