breaking-newsपिंपरी / चिंचवड

एच. ए. कंपनीकडून महापालिकेला १२,५०० लिटर ‘सॅनिटायझर’ भेट

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपाय योजनेला सहाय्य म्हणून हिंदूस्तान अँटीबायोटीक्स लि. यांच्या वतीने रुग्नालयासाठी आवश्यक १२, ५०० लिटर इतके हँडसॅनिटायझर आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे कंपनीच्या प्रबंध निर्देशिका गिरिजा सराफ यांच्याहस्ते देण्यात आले.

यावेळी हिंदूस्तान अँटीबायोटीक्स लि. सहाय्यक व्यवस्थापक निता घोष व जनसंपर्क अधिकारी अविनाश थोपटे उपस्थित होते. तसेच हिंदूस्तान अँटीबायोटीक्स लि.च्या माध्यमातून सीएसआर मार्फत पीपीई किट व मास्क महानगरपालिकेला उपलब्ध करुन देणार असल्याचे गिरिजा सराफ यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button