breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#We Need Munde For pcmc, सोशल मीडियावर मोहीम

‘तुकाराम मुंढे यांची नियुक्‍ती महापालिका आयुक्तपदी करा’, जनमाध्यमातून होतेय मागणी

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कार्यक्षम अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी जनसामन्यातून होवू लागली आहे. याकरिता #We Need Munde For pcmc, सोशल मीडियावर मोहीम राबवण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मुंडे यांची पुणे की पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करणार, यावरुन चर्चेला उधाण आले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नागपूरहून श्रावण हर्डिकर यांची आयुक्तीपदी नियुक्ती झाली. हर्डिकर हे पालिकेत रुजू झाल्यापासून सतत वादग्रस्त राहिले आहेत. राज्यात भाजप सत्ता असल्याने नागपूरचे देवेंद्र फडणवीस यांचे हर्डिकर हे विश्वासू मानले जात होते. त्यामुळे पिंपरी महापालिकेची सुत्रे हर्डिकराकडे सोपविली होती.

तसेच महापालिकेतही सत्ताधारी भाजप पदाधिकारी आणि पालिकेचे कारभारी असलेल्या दोन्ही आमदारांची प्रत्येक कामकाजात लुडबूड सुरु आहे. आयुक्त हर्डिकर यांनाही भाजपचे कारभारी काम करु देत नाहीत. कारभा-याची मर्जी सांभाळून हर्डिकरांना प्रत्येक पाऊल विचारपुर्वक उचलावे लागत आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षात नागरिकांना पाणी, कचरा, रस्ते याशिवाय नदी प्रदुषण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यास अपयशी आले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने आयएएस, आयपीएस अधिका-यांच्या बदल्याचे सत्र सुरु होणार आहे. त्यातच ‘कार्यक्षम अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुणे की पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करावी,’ अशी मागणी जोर धरु लागली आहे. पिंपरीचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या बदलीसाठी विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना निवेदन सादर करण्यात आले आहे.

श्रावण हर्डिकर यांचा आयुक्तपदाचा कार्यकाळ संपत आला असून ते स्वता:हून बदली करण्याच्या तयारीत आहेत. तुकाराम मुंढे यांच्यासारखा कार्यक्षम अधिकारी पिंपरी चिंचवड महापालिकेत आयुक्त म्हणून नियुक्त करायला हवा. मुंढे यांना राज्य सरकारने पाठबळ दिल्यास पिंपरी चिंचवडकर नागरिकही त्यांना साथ देतील.

शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या समस्या, नदी प्रदुषण, पर्यावरण संरक्षण व संवर्धन, पाणी, रस्ते आदी प्रश्न सोडविण्याच्या प्रक्रियेला गती येईल. त्यामुळे राज्य सरकारने मुंढे यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करावी. अशी मागणी होवू लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button